१२ मे, २०१०

सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

                      ग्रंथाली प्रकाशनाने नुकतेच जानेवारी २०१० मध्ये डॉ. उज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)" हे पुस्तक प्रकाशीत केलं आहे.या पुस्तकाला डॉ. स्नेहलता देशमुख यांची सर्मपक प्रस्तावना लाभली आहे.त्याच प्रमाणे स्वत: लेखिकेने " गुज मनीचे "या मनोगतात हे पुस्तक लिहीण्या मागचे गुज मांडले आहे.डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना आणि लेखिकेचे " गुज मनीचे "हे मनोगत वाचल्या नंतर या पुस्तकाबद्दल वेगळ्या शब्दात काही लिहाव अस काही शिल्लकच राहात नाही.

                     मॊकळे पणाने व सोप्या शब्दात डॉ. उज्वला दळवी यांनी त्यांचे सौदी अरेबितातील मांडले आहेत की त्या मुळे हे पुस्तक वाचनीय झाल आहे. मराठी माणसाची, विशेषत: मध्यमवर्गीय मराठी माणसाची एक वेगळीच मानसीकता आहे. अतिशय संवेदनशील आणि चांगल्या गोष्टींचा तत्परतेने स्विकार असा खुल्या मनाचा हा समाज आहे.जात्याच संवेदनशील असणारी ही माणसे आजुबाजूच्या घडण्यार्‍या घटनांकडे अलिप्तपणे पाहूच शकत नसल्याने चटकन दुखावली जातात.डॉ. दळवी या देखिल मध्यमवर्गीय मराठी समाजातील असल्याने सौदी अरेबिया सारख्या कर्मठ मुस्लीम राष्ट्रातील अनेक अनुभवांनी त्यांना वेळोवेळी ठसके आले. महत्वाच म्हणजे ते सर्व अनुभव त्यांनी प्रामाणीकपणे व्यक्त केले आहेत. मध्यमवर्गीय मराठी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण गेली अनेक वर्ष विविध देशात गेले आहेत व आजही जात आहेत.त्या पैकी अनेक जणांनी त्यांचे परदेशातील अनुभव पुस्तकां मधुन मांडलेले देखिल आहेत. पण बहुतेकांचे अनुभव हे त्यांनी परदेशात कसे कष्ट केले व ते यशस्वी कसे झाले या बद्दलच लिहीलेले आहेत. डॉ. दळवी यांच्या प्रमाणेच १५ ते २० वर्षापुर्वी परदेशात गेलेल्यांपैकी अनेकांना कटु अनुभव आलेही असतील पण ते त्यांनी तितकेसे मांडलेले नाहीत. कदाचीत " मान सांगावा जनात , अपमान ठेवावा मनात" हे संस्कार असल्याने तसे झाले असावे.

                      याच पार्श्वभुमीवर डॉ. उज्वला दळवी यांचे पुस्तक वेगळे ठरते. त्यांच्या लिखाणामधुन परदेशात कामासाठी गेलेल्या लोकांना कसे वाइट अनुभव येवू शक्तत याची कल्पना येते.हे अनुभव बर्‍या वाईट प्रमाणात परदेशी गेलेल्यांच्या पहिल्या पिढीला आले असल्यानेच त्यांच्या मनात " ने मजसी ने परत मातृभुमीला" ही भावना आढळून येत असावी अस मला वाटत. आता पुस्तका बद्द्ल जास्त काही लिहीत नाही कारण हे पुस्तक मुळापासून वाचाव असच आहे.

                     शेवटी डॉ. दळवी यांनी पुस्तकात नमुद केलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात मांडत आहे. त्या लिहीतात-

                     मध्यम वयाची एक बाई आठवड्यातून एकदा तरी येउन मला कडाकडा शिव्याशाप देवून जाई. एक दिवस यथेच्छ शिव्या घालून झाल्यावर म्हणाली," मला घरी वैताग आला ना की तुझ्याकडे येते बघ. एकदा तुझ्याकडे अस मन मोकळ करुन टाकल की मी घरी आनंदात नांदते.माझ्याकडे दागदागीने, कपडेलत्ते पुष्कळ आहेत. घरात माणसांनाही तोटा नाही. पण अस माझ बोलण ऎकून घेणार मला तुझ्या खेरीज दुसर कोणीही नाही."

                  हा प्रसंग वाचल्यावर सौदी अरेबियातील मुस्लीम त्रीच्या मनाचा होणारा कोंडमारा तर जाणवतोच पण त्याच बरोबर नोकरी निमित्याने आलेल्या परदेशी माणसांकडॆ तुच्छतापुर्वक बघण्याचा त्या देशातील माणसांचा बेमुर्वतखोर दृष्टीकोन आपल्याही मनाला ठेच पोहचवतो.

                   पुस्तक वाचता वाचता डॉ. उज्वला दळवी यांना लागलेल्या ठेचा व आलेले ठसके यांच्याशी कसे समरस होतो हेच कळत नाही. मला वाटत हेच या पुस्तकाचे वैशिष्ट आहे

२ टिप्पण्या:

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com म्हणाले...

तुमचा ब्लाॅग सुंदर शब्दांनी गुंफलेला असतो. हाच मजकूर तुम्ही www.globalmarathi.org वरच्या THINKTANK वरच्या ब्लाॅग विभागात पोस्ट कराव्यात ही विनंती आहे. तुमचे विचार सर्वांपर्यत पोजावेत असे वाटते.

कृपया शंका असली तर फोन करावा.

9552596276

Devendra म्हणाले...

माननीय marathmola
धन्यवाद,
आपल्या अभिप्राया बद्दल मनापासुन आभार. तुमच्या सुचनेच स्वागत करतो. तुम्ही सुचवल्या प्रमाणे मजकूर www.globalmarathi.org वरच्या THINKTANK वरच्या ब्लॉग विभागात पोस्ट करण्या पुर्वी तुमच्याशी नक्कीच संपर्क साधेन. फ़ोन नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करत आहे.
आपला
मैत्रेय१९६४