१८ मे, २०१०

वन फ़ॉर सॉरो

                                                     लेखिका : अनुराधा कुलकर्णी
                                                     प्रकाशक : ग्रंथाली

                    श्रीमती अनुराधा कुलकर्णी यांनी लिहीलेल हे पुस्तक मनाला अस्वस्थ करुन सोडत. कॅप्टन अभय कुलकर्णी यांच्या सारख्या सैनिकी पेशातील उमद्या तरुणाशी लेखिकेने समजुन उमजुन लग्न केल. लेखिकेच हे सर्वसामान्य तरुणींपेक्षा असलेल वेगळेपण त्यांच्या लिखाणामधुन पण दिसुन येत. सैनिकी पेशाबद्दल आपल्या सारख्या नागरी जिवनातील लोकांमध्ये किती अज्ञान आहे याची जाणिव त्यांच्या लिखाणा मधुन आपल्याला प्रकर्षाने होते.सैनिकांना अनेक वस्तु सवलतीच्या दरात मिळतात याचा जरुरीपेक्षा जास्त उहापोह केला जातो या बद्दलच्या लेखिकेच्या मनातील विषादाशी सहमत होण्यापेक्षा दुसरा पर्याय हे पुस्तक वाचल्यावर आपल्या मनात येवूच शकणार नाही.आपल्या सारखे नागरी जीवनातले सारे स्थौर्य व सुख अनुभवणारे लोक शांततेच्या काळात सैनिकांना पारच विसरुन जातो याची जाणीव आपल्याला नसतेच हे लेखिकेच स्वानुभवाने झालेल मत कटू वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येईल का?. शांततेच्या काळात सुद्धा देशाच्या सिमेवर आघोषीत युध्द सुरुच असल्याने त्या काळात देखिल सैनिकांच जिवन जोखमीच आणि तणावग्रस्त असत याची जाणीवच आपल्याला नसते.

                  तिनही युध्दांमधुन सुखरुप परत आलेल्या कॅप्टन अभय कुलकर्णी यांच निधन मिलिटरी हॉस्पीटल मध्ये योग्य वेळी उपचार न मिळाल्याने होते याची हळहळ आपल्याला देखिल वाटल्या शिवाय राहात नाही.त्यांच्या पश्चात लेखिकेने केवळ आपल्या पतीच्या आठवणींच्या जोरावर कश्या प्रकारे जीवन व्यथीत केल आणि मुलांच संगोपन केल हे वाचल की सैनिकांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती समाज किती असंवेदनशील आहे याची बोचरी जाणीव मनाला होते.लेखिकेने उण्यापुर्‍रा दहा-अकरा वर्षाच्या पतीसोबत घालवलेल्या सहवासाच्या स्मृतींमधुन सैनिकांच जगणे व त्यांची जिवना कडे बघण्याची दॄष्टी कशी असतॆ याचा यथार्थ परिचय करुन दिला आहे.त्या वरुन जिवनातील छोट्या छोट्या अडचणीचा आपण उगाचच बाऊ करतॊ हे लक्षात येत.

                     थोडक्यात काय, सैनिक हे सदैव मातृभुमीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मरणाला सामोरे जातच असतात व अश्या सैनिकां प्रती नागरी समाजाचा दृष्टीकॊन कसा असंवेदशील असतो याची जाणिव सरळ सोप्या भाषेत करुन देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. त्या मुळे लेखिका जणू वाचकांशी संवाद साधते आहे असच वाटत.

मैत्रेय१९६४

२ टिप्पण्या:

नागेश देशपांडे म्हणाले...

नमस्कार,

आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.

नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com

Devendra म्हणाले...

प्रिय नागेश,
संपर्क साधल्या बद्द्ल आभार. प्रतिक्रिया देण्यास झालेल्या उशिरा बद्दल दिलगीरी. तुझा ब्लॉग नक्कीच वाचेन. एकमेकांचे विचार समजुन घेण्यासाठी हा एक नविन पर्याय उपलब्ध आहे त्याचा उपयोग करुया.
आभार
मैत्रेय१९६४