१४ जाने, २०१२

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध


लेखक :डॉ. जयसिंगराव पवार
 प्रकाशक:सुमेरु प्रकाशन, डोंबिवली.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या दुख:द निधना नंतर महाराजांच्या कुटुंबातच संघर्षला सुरुवात झाली. या संघर्षात सरशी होवुन संभाजी महाराज स्वराज्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. पाठोपाठ वार्ता आली ती शहेनशाहा औरंगजेब हा प्रचंड मोठा फौजफाटा घेवुन स्वराज्यावर चालुन येत असल्याची. आणि पाहाता पाहाता सन १६८१ मध्ये ते संकट स्वराज्यावर आलंच.....
शहेनशाहा औरंगजेब हा कधिकाळी दख्खनचा सुभेदार होता.त्या मुळे त्याला दख्खनी मातीतल्या गुणदोषाची, अंतर्गत संघर्षाची आणि भौगोलीक रचनेची चांगलीच माहीती होती. तरी देखिल त्याला संभाजी महाराजांच्या रणकौशल्यामुळे सुरुवातीला म्हणावं तस यश मिळालं नाही. त्यामुळे त्याने स्वराज्य जिंकण्याचा नाद सोडुन सन १६८६ साली प्रथम आदिलशाही व नंतर कुतुबशाही नष्ट केली. त्या नंतर त्याने दख्खन मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उभ्या असलेल्या स्वराज्याकडे सर्वशक्तीनीशी आपला मोहरा परत एकदा वळवला. आणि त्याला मोठं मिळालं ते सन १६८९ मध्ये. शिर्क्यांच्या दगलबाजी मुळे छत्रपति संभाजी महाराज संगमेश्वर येथे ३ फेब्रुवारी १६८९ या दिवशी कैद झाले. त्या नंतर ठार मारण्यापुर्वी अत्यंत क्रुरतेने मराठ्यांच्या या राजाचा छळ करण्यात आला. त्या वेळी संभाजी महाराजांचे जे हाल करण्यात आले त्यांचं वर्णन आज जरी वाचलं तरी डोळ्यातुन क्रोधाच्या अंगाराचे अश्रु वाहील्या शिवाय राहात नाहीत. ठार मारल्या नंतर धर्मविर छत्रपति संभाजी महाराजांचे शिर भाल्यावर रोवुन ते उन्मादाने गावागावात फिरवण्यात आले. ज्या प्रकारे मराठ्यांच्या या राजाने अत्यंतीक हाल सोसुन आपले प्राण स्वधर्मासाठी दिले ते पाहुन त्या वेळच्या मराठी समाजाला स्वराज्यासाठी बलिदान करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रेरणेतुन जो संघर्ष सुरु झाला त्याची परिणीती क्रुरकर्मा औरंगजेबाची अखेर याच मराठी मातीत होण्यात झाली. अंतिम विजय मराठ्यांचा झाला आणि त्या नंतर उभ्या हिंदुस्थानात मराठ्यांच्या राजकीय व सामरिक वर्चस्वाला आव्हान देण्याची हिंमत कोणालाच झाली नाही.
आपल्याकडे शिवछत्रपतिंच्या व छत्रपति संभाजी महाराजांच्या कारकिर्दी बद्दल बरेच लिहीलं गेलेलं आहे.पण संभाजी महाराजांच्या बलिदाना पश्चात ज्या प्रकारे मराठे बलाढ्य अश्या मोगलां विरुद्ध एकाकी लढले त्या बद्दल त्या विषयी फारस काही लिहीलं गेलं नाही. या मुघलां विरुद्धच्या संघर्षात मराठ्यांना काही अपवाद वगळता उर्वरीत हिंदुस्थानातुन काहीही मदत झाली नाही हे बाब आवर्जुन लक्षात ठेवण महत्वाच आहे. तेव्हा या उपेक्षित, संघर्षामय व अत्यंत अभिमान वाटावा अश्या कालखंडा बाबत आजच्या मराठी समाजाला जाणिव व्हावी या हेतुने डॉ. जयसिंगराव पवार यांनी " मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे पुस्तक लिहील आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अत्यंत पराकोटीचा अभिमान असलेले माझ्या सारखे अनेक जण आहेत. या मध्ये फक्त मराठी माणसंच नसुन मराठी भाषक नसलेले पण हिंदुस्थानच्या संस्कृतीचा अभिमान असलेले अनेक जण आहेत. किंबहुना महाराष्ट्रा बाहेर आजही मराठी समाजाकडे जे काही आदराने बघितलं जातं ते आजच्या समाजाच्या कर्तुत्वामुळे नव्हे तर आपल्या पुर्वजांनी देशाच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदाना मुळे. त्यामुळे संपुर्ण मराठी समाजाने वर्तमानकाळात जगताना आपल्या इतिहासाची शक्य होईल त्या त्या मार्गाने जाणिवपुर्व माहिती करुन घेतली पाहिजे. त्या साठी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सारख्या अभ्यासु इतिहासकारांनी लिहीलेली पुस्तकं संदर्भग्रंथ म्हणुन तसंच आपल्या इतिहासा बद्दल ईतरांना माहिती करुन देण्यासाठी जरुर वाचायला हवीत.
आता थोडक्यात डॉ.पवारांच्या पुस्तका बाबत. त्यांचे "मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तक जाणिव करुन देत की,:
छत्रपति शिवाजी महाराजांच्या दुख:द निधना नंतर शहेनशाहा औरंगजेब हा प्रचंड मोठा फौजफाटा घेवुन सन १६८१ मध्ये स्वराज्यावर चालुन आला तो पासुन ते औरंगजेबाच्या सन १७०७ मध्ये मृत्यु पावतो असे २६ वर्षे मराठ्यांचे हे स्वातंत्र्ययुद्ध सुरु होते. या स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा होती ती म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या मध्ये निर्माण केलेले स्वातंत्रप्रेम व स्वराज्याभिमान. एखादा सर्वसामान्य समाज या प्रदिर्घ संघर्षात दुबळा होवुन नष्ट झाला असता. परंतु या संघर्षातुन मराठी समाज तावुन सुलाखुन व विजयी होवुन बाहेर पडला. या संघर्षा मधुन मराठी समाजाच्या चिवटपणाची, जिद्दीची, शौर्याची जाणिव मुघलांसह उर्वरीत हिंदुस्थानाला तर झालीच पण त्याहुन महत्वाच म्हणजे आपल्यातल्या स्वकर्तुत्वाची एक नवी जाणिव मराठी समाजाला पण झाली.
संभाजी महाराजांना शत्रुने पकडुन नेल्याची बातमी रायगडावर आल्यानंतर स्वत: राणी येसुबाई यांनीच अत्यंत धोरणीपणाने राजाराम महाराजांनी छत्रपति म्हणुन गादीवर बसावं असा निर्णय घेतला व पुत्रप्रेमापेक्षा स्वराज्याच हीत महत्वाचं हा संदेश सर्वसामान्य जनता व सैनिकां पर्यंत दिला. त्याच प्रमाणे राज्याभिषेका नंतर छ्त्रपति राजाराम महाराजांनी गडा बाहेर पडुन युध्द सुरु ठेवावं असा सल्ला दिला. त्यामुळे रायगड पडल्या नंतर देखिल मराठ्यांच नेतृत्व जिंजी येथे सुरक्षित राहीलं व स्वराज्याचा संघर्ष सुरुच राहीला. छ्त्रपति शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका नंतरच्या दक्षिण दिग्वीजयाच्या वेळी आपल्या चुलत भावाकडुन ताब्यात घेतलेला जिंजीचा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणुन मोठा कामी आला.
या लष्करी संघर्षात मोघलांच्या मानाने मराठ्यांकडे निश्चितच सैन्यदल आणि साधन सामुग्री कमी होतं.तरी देखिल सैन्याच्या जलद हलचाली व गनिमीकाव्याचा वापर या मुळे मराठ्यांना अंतिम विजय मिळवता आला. या संघर्षात लष्करी डावपेचांची जाणिव असलेल्या मराठी समाजाची नविन पिढी निर्माण झाली ज्यातुन अनेक पराक्रमी विर निर्माण झाले. हे स्वातंत्रयुद्ध औरंगजेबाच्या मृत्यु नंतर संपले. पण या संघर्षातुन पुढे आलेल्या या पराक्रमी विरांनी पुढील काळात मराठी राजसत्तेचा विस्तार पेशवा बाजीरावाच्या काळात नर्मदेपार नेण्यात मोठी भुमिका पार पाडली.
मोगल-मराठे संघर्षाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे मराठ्यांच्या बाजुने हे लोकयुद्ध होतं तर मोगलांच्या बाजुने बादशाही युद्ध. मराठे लढले ते स्वराज्याच्या व स्वधर्माच्या संरक्षणासाठी. त्या मुळे छ्त्रपती राजाराम हे दुरप्रांतात जिंजी येथे असुनही इकडे महाराष्ट्रात सर्वसामान्य मराठी जनता कोणत्याही वैयक्तीक लाभाची अपेक्षा न ठेवता शत्रुशी लढत राहीली.
स्वातंत्र्य हा मानवी समाजाचा मुलभुत हक्क आहे.त्या मुळे स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा असणं व ते स्वातंत्र्य ते टिकवण्यासाठी प्रयत्न करण यातुन अनेक वेळा संघर्ष झाल्याच जगाच्या इतिहासात दिसुन आलेलं आहे. दुसर्‍या समाजाच स्वातंत्र्य हिरावुन आपले वर्चस्व प्रस्थापीत करु पाहाणार्‍या सत्ताधिशांचा अखेर पराभवच होतो. या संघर्षात मराठे हे स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्यामुळे अंतिम विजय त्यांचाच झाला.
वर सारांशाने दिलेल्या माहिती व्यतिरीक्त ईतर बर्‍याच गोष्टी"मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे पुस्तक वाचल्या नंतर नव्याने आपल्याला कळतात . तेव्हा या पुस्तकातुन बोध घेण्यासारख खुप काही आहे याची अल्पशी जाणिव करुण देण्याचा माझा हा प्रयत्न आपणास आवडावा ही ईच्छा.
जय महाराष्ट्र जय मराठी.
(सन १७६१ च्या १४ एप्रिललाच पानीपतचं तिसरं युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाल होतं. या युद्धात मराठ्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करुया व त्यात प्राणार्पण केलेल्या ज्ञात-अज्ञात विरांना वंदन करुया.)

1 टिप्पणी:

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

मराठ्यांच्या मनात शिवाजी आणि संभाजी जागृत होते तो पर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण देशावर सत्ता होती.
जेव्हा मराठे शिवाजी आणि संभाजी महाराजांना विसरले ..
आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली .
पानिपतची लढाई झाली मराठे त्वेषाने लढले पानिपतच्या पराजयानंतरहि
मराठ्यांनी देशाच्या राजकारणावर पुन्हा पकड मिळवली .
त्या "हरामखो...र अहमद शाह अब्दालीला" सामोरे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठेच गेले.
उत्तर भारतातील शीख,गुरखा,जाठ्ह,राजपूत,बुंदेले इत्यादी
समाजातील आपापल्या बिळात उंदरासारखे लपून बसले होते ..
आणि हेच लोक आजकाल मराठ्यांना देशभक्तीचे उपदेश देतात.
अरे जा ... भारताचा इतिहास चाळून बघा .. मराठे हे आधीपासून देशाचाच विचार करत आले.
नंतर आपला ...