४ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’

 

भाग-१

नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात -सव्वासात वाजता ऑफ़ीस मधुन घरी आलो. बेल वाजवली तर समोर कुटुंब. मला पहाताच कुटुंब म्हणालं, " बर झाल. आज लवकर घरी आलास."
हे वाक्य कानी पडल आणि मी जरा सावध झालो  .कारण या वाक्याचे त्याच्या सुरांवरुन बरेच अर्थ काढता येतात याचा मला चांगलाच अनुभव आहे. उदारणार्थ, तिला मला काही काम सांगायच असेल तर सुर काहीसा नरमाईचा असतो. सुर आश्चर्याचा असेल तर टवाळ मित्रांबरोबर कुटाळक्या करत कसा बसला नाहीस अस तिला म्हणायच असतं. आणि सुर चढा असेल तर कालच्या सारखी मित्रांबरोबर ढोसत बसला नाहीस वाटत अस तिला म्हणायच असत. पण आजचा सुर काळजीचा वाटला. पण तरीही फार विचार करत न बसता बुट काढायला सुरुवात केली.
तेव्हड्यात कुटुंब म्हणालं, " थांब जरा.बुट एव्हड्यात काढु नकोस.चहा केलाय तो घे". 
मी जरा आश्चर्यच वाटलं. कारण संध्याकाळी घरी आल्यावर मी चहा वैगरे दुसरं काही न घेता सरळ जेवायलाच बसतो हे कुटुंबला चांगलच ठावुन आहे तेव्हा मी यावर काही बोलणार त्याच्या अगोदर चहा समोर आलाच. मग मुकाट्याने चहा प्यायला सुरुवात केली. चहा पिता पिता मी तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघितल.
ती म्हणाली ," सांगते. पण चहा तर पी."
अस कोणी कोड्यात बोलल की माझ लक्ष हातातल्या कामाकडे लागत नाही .पण समोर साक्षात कुटुंब असल्याने चहा मुकाट्याने संपवण्या शिवाय पर्यायच नव्हता.चहा संपताच तिच म्हणाली, "आता मी जे काय सांगतेय ते जरा शांतपणे ऐकुन घे."
आता मात्र हद्द झाली . मी तिरसटलोच.
" ईतक्या वेळ शांतच बसलो आहे ना? की नाचत बसलोय."
माझ्या असल्या चिडण्याला किती किंमत द्यायची हे तिला अनुभवाने माहित असल्याने ती परत म्हणाली,
" शांतपणे ऐकुन घेणार असशील तर सांगते."
हे वाक्य परत एकदा ऐकल्यावर माझा तिळपापड झाला . पण वांझोट्या चिडण्या मध्ये अर्थच नसल्याने मुग गिळुन बसलो.
" अरे,सत्त्याला सिद्धीविनायक हॉस्पीटल मध्ये अ‍ॅडमीट केलय. सिरीयस आहे."
" काय म्हणतेस. डोक ठिकाणावर आहे ना तुझं?"
" मी दोन तास तिकडेच दवाखान्यातच होते. तुझी ऑफ़ीस मधुन येण्याची वेळ झाली होती म्हणुन १०-१५ मिनीटांन पुर्वीच घरी आलेय."
"काय झाल अचानक."
बातमीचा धक्काच ऐव्हडा होता की मला जास्त बोलताच आलं नाही.
" ते नंतर सावकाश सांगीन. पहीले लवकर हॉस्पीटल मध्ये जा. भाऊजी तुमचीच आठवण काढत होते."
खर तर हे सांगण्याची आवश्यकता नव्हती पण बातमी ऐकुन माझ्याच पायातल बळ नाहीस झाल होत
. कस बस स्वत:ला सावरलं आणि हॉस्पीटलला पोहोचलो.आमच्या बिल्डींग मधली ४-५ रिटायर्ड मंडळी तिथे हॉस्पीटलच्या खाली उभी होती पण धावपळ करायची वेळ आलीच तर त्यांचा काही उपयोग नव्हता........
त्यांनाच विचारल
," कितवा मजला."
" अरे आयसीयु ,तिसरा मजला , माहित नाही का?"
खर म्हणजे सत्त्या सिरीयस आहे हे कळल्यावर तो आयसीयुतच असणार हे मलाही कळत होत पण मनाला वळत नव्हत. हॉस्पीटल ५ मजली असल्याने लिफ्ट आहे. पण स्व:ताला धीर यावा म्हणुन चालत चालत तिसर्‍या मजल्यावर पोहोचलो. तिसर्‍या मजल्यावर पोहोचताच दरवाज्यात पहिल्यांदा वहिनीच भेटल्या. त्याने बर वाटल कारण त्याच्या पेक्षा त्याच जास्त धीराच्या आहेत. मला पाहाताच त्या म्हणाल्या, " जा बाबा, तो तुझीच वाट पाहातोय."
" चला वहिनी ,बरोबरच जाऊया"
" अरे तु जा आत. मी जरा डॉक्टरांना भेटुन येते."
शेवटी त्याला एकट्यानेच मला समोर जाव लागणार होत हे नक्की झाल. तिसर्‍या मजल्यावर डाव्या बाजुला वळुन आयसीयु समोर पोहोचलॊ. पाहातो तर काय तो आयसीयु च्या दरवाज्याच्या छोट्या काचेतुन आत बघत उभा होता. खर तर त्या काचेतुन आतल काहीच दिसत नाही. पण तरीही त्या काचेतुन आत बघण्याचा प्रयत्न बहुतेक पेशंटची नातेवाईक मंडळी का करतात याच मला नेहमीच आश्चर्य वाटत. त्या ला मात्र तिथुन आत बघताना पाहुन मी सुटकेचा निश्वास सोडला . कारण त्याच्या डोळ्याला डोळा देण्या पेक्षा त्याला पाठमोरा पाहण जास्त सोप वाटत होत. मी सोडलेला सुटकेचा निश्वास त्याच्या पर्यंत पोहोचला की काय कोण जाणे कारण त्याने पटकन मागे वळुन माझ्याकडे पाहीलं. पण त्याची ती नजर जणु माझ्या पलीकडच आरपार पाहत असल्या सारखी होती. मग मीच त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर थोपटलं.
" कसा आहे रे सत्त्या"
" ठीक आहे, पण अजुन ४८ तास क्रिटीकल आहेत अस डॉक्टर म्हणाले."
हे वाक्य तो ईतक्या कोरडेपणान म्हणाला की सत्त्याचा आणि त्याचा जणु काही संबधच नाही. तो सत्त्या बद्दल खरच एव्हड्या कोरडेपणाने बोलला की मलाच तसं जाणवलं कोण जाणे.त्याचा कोरडॆपणा पाहुन आता मात्र मला पुढे काय म्हणायच तेच सुचेना. कारण ज्याला धीर द्यायला मी आलो होतो तो तर या सर्वांशी त्या"चा काही एक संबंधच नाही असा निर्वीकार चेहरा करुन बसला होता. अशीच पुढची ४-५ मिनीटं असाह्य शांततेत गेली. मग त्यातुन कोंडी फुटावी म्हणुन मीच विचारलं,
" काही आणायच वैगरे आहे का ?"
" काही नाही.डॉक्टर आणि ही सगळ बघत आहेत.तु ऑफीस मधुन येवुन दमला असशील ना?.बस आराम कर."
काहीतरी खटकत होत त्याच्या वागण्यातल, पण नक्की काय तेच समजत नव्हत.आणि सालं आयसीयुच्या बाहेरची बाकडी काय आराम करत बसण्या साठी असतात. पण बोलण्यात जास्त अर्थ नव्हता.बसलो बाकड्यावर. तो स्वत: मात्र परत आयसीयुच्या काचेतुन आत बघत उभा राहीला.यातुन माझी सुटका करण्यासाठीच की काय जणु, वहिनी तेव्हड्यात तिथे आल्या.
" काय रे. तुझ्याशी तरी हा बाबा बोलला का?"
" बोलला ना. आराम कर म्हणाला."
" चिडु नकोस. त्याला आत्ता काय वाटत असेल याची कल्पना आहे ना?"
" नाही ग वहिनी. कसा चिडेन त्याच्यावर. तो ही सत्त्या ...... "
वहिनी सत्त्याची आई आहे हे का लक्षात आल्याने पुढचे शब्द गिळुन टाकले.
" मला वाटल होत तुझ्याशी तरी बोलेल"
म्हणजे हा माझी आठवण काढत होता ही आमच्या कुटूंबाचीच थाप वाटत.माझ्या मनातले विचार जाणुन वहिनीच बोलल्या,
" अरे मीच तिला तुला तस सांगायला सांगीतल. हा बाबा तर दगडच होवुन बसलाय म्हटल तुझ्याशी बोलुन मोकळा होईल"
" नक्कीच होईल वहिनी. त्याच्या कडे मी बघतो तु सत्त्याकडे बघ."
" मला ही खात्री होतीच."
वहिनी अश्या वेळी सुध्दा किती ठामपणे वागतेय.खर तर वहिनीच अस वागण हा माझ्या बायकोचा कौतुकाचा विषय तर माझा आदर्श हा ........
 
 
 


 


 

 

 

 


 


 
 
 

 





 

 










 


 
 

 



 


 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: